ज्या क्षेत्रामध्ये विकासाची पाळेमुळे आहेत, अशा सर्व क्षेत्रांबाबत अर्थसंकल्पातल्या तरतुदी अतिशय किरकोळ आहेत
विकास ही एक गतिमान प्रक्रिया आहे. गेल्या वर्षी आपण काय संकल्प केले, ते किती वास्तववादी होते, ते जर खूप महत्त्वाचे असूनही सिद्धीस जाऊ शकले नसतील, तर आपण काय धोरणात्मक बदल करायला हवे आहेत? बदलत्या जागतिक परिस्थितीमुळे त्यातले काही अनाठायी झाले असतील का? असा विचार करून प्रत्येक पुढील अर्थसंकल्पाकडे वाटचाल करता आली, तर आपल्यालाच आपली वाट नीट सापडेल. नाही तर अशा परिस्थितीत आपण केवळ ‘विकसित भारत’च्या घोषणा देत राहू!.......